Categories
Testimonial

सौ. वर्षा सचिन होते

मी सौ. वर्षा सचिन होते माझी मुलगी कुमारी श्रावणी सचिन लोहोटे इयत्ता आठवी व माझा मुलगा वेदांत लोहोटे इयत्ता तिसरी आपल्या वैयक्तिक प्रतिक्रिया व्यक्त करताना…..
संपूर्ण देश कोरोनाच्या भयानक संकटात सापडलेला असताना सर्व जगाची यातायात थांबलेली असताना जाजू इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ या शाळेने सर्वप्रथम सकारात्मक पाऊले उचलून विद्यार्थ्यांना हायब्रीड शिक्षण प्रणाली द्वारे म्हणजेच, व्हिडिओज ऑनलाईन क्लास, शंकानिरसन असे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणारी ही एकमेव संस्था आहे.
विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर अभ्यासपूरक उपक्रमातून नाविन्यता देऊन वैयक्तिक व सामाजिक व्यक्तिमत्व घडविण्याचा मानस या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा जाजू यांचा असतो त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मिटीगद्वारे योग्य वैयक्तिक व कौटुंबिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यात नेहमी अग्रेसर असणारे त्या स्वतः आणि त्यांचे शिक्षक! खरोखरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ही शाळा एकमेव अशी केंद्र आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना पूर्वप्राथमिक वर्गापासून या शाळेत दाखल केले तर नक्कीच विद्यार्थ्यांचा बालकांचा शारीरिक,मानसिक, भाषिक, बौद्धिक विकास होईल याचा मला विश्वास आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे केवळ एक पद म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांसाठी मातृप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्या निगराणीत बालकांची सर्वतोपरी काळजी या संस्थेत घेतली जाते. अशी ही विश्वसनीय संस्था आहे. माझ्या माहितीप्रमाणे या संस्थेच्या अंतर्गत नवीन इंटरनॅशनल स्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाची स्कूल सुरू करण्यात येत आहे जेथे बालकांसाठी विविध कलाकौशल्य युक्त शिक्षण उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या 3H ( Head,Heart and Hand) चा विकास करणारी ही संस्था केंद्र असणार आहे. तेव्हा त्या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी शुभेच्छा देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *